VIDEO | भीमा कोरेगाव संदर्भात राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

VIDEO | भीमा कोरेगाव संदर्भात राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्राचे नवनर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राष्ट्रवादीकडून भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील दलितांवरील गुन्हे माफ करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे ही मागणी गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर केली जात होती. याबाबतचे पत्रच आता आमदार प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. या पत्रातून गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे.

प्रकाश गजभिये यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही पत्रातून गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मागणी केली आहे. मुंडे यांनी म्हटले आहे की, 'भीमा कोरेगाव दंगलीत सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांविरुद्ध तत्कालीन भाजप सरकारने हेतुपुरस्सर नोंदवलेले गुन्हे मागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावेत. भाजप सरकारच्या अत्याचारात बळी ठरलेल्यांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करावे'

उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. तसेच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत आरे आंदोलनाचे केसेस मागे घेतलात, आता नाणार आंदोलनाच्या केसेस पण परत घ्या, ते ही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते, अशी मागणी केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी आदेश देत नाणार रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते.

Web Title: NCP demands CM to withdraw crime in Bhima Koregaon case

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com